पंचायत समिती कार्यालयात अनेक अधिकारी - कर्मचारी गैरहजर

Foto
▶ सामाजिक कार्यकर्त्याच्या पंचनाम्यात प्रकार उघड, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

गंगापूर, (प्रतिनिधी): येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी व अधिकारी गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक शिरसाठ यांनी दि. १३ सोमवार रोजी केलेल्या पंचनाम्यात ही बाब उघडकीस आली आहे. त्यांनी पंचायत समितीतील आरोग्य, महिला व बालकल्याण, कृषी, घरकुल, स्वच्छ भारत मिशन आदी विभागातील कार्यालयाला मुख्यालया दिनादिवशी सकाळी साडेदहा वाजता भेट दिली असता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या पंचनाम्यात अनेक कर्मचारी अधिकारी कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी कार्यालयात येऊनही संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना ताटकळत थांबावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण यानीकाहीदिवसांपूर्वीच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करून कार्यालयात नियमित हजर राहण्याच्या  स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक कर्मचाऱ्याऱ्यांनी अक्षरशः केराची टोपली दाखवल्याचे चित्र समोर आले आहे. 

वेळेत कार्यालयीन अनुपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर, हालचाल रजिस्टर यांची तपासणी करून गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून त्याच्याकडून खुलासा मागवून पुढीलयोग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
- राजेश्वर हिवाळे उपसभापती.